
अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील एका अट्टल दुचाकी चोराला गाडगेनगर पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील हातगाव येथून ७ मे रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सय्यद मोहसीन उर्फ राजा सय्यद अजीज (३६, रा. अंजनगाव सुर्जी) असे अटक चोराचे नाव आहे. जलारामनगर येथील शिवा राजेश सावके (३०) यांनी ७ मार्च रोजी दुपारी दुचाकी क्रमांक एमएच ३७ यू ४८२८ ही पंचवटी चौकातील उड्डाणपुलाखाली उभी केली होती. सदर दुचाकी लंपास करण्यात आली. या प्रकरणी शिवा सावके यांनी ८ मार्च रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात सदर गुन्ह्यात सय्यद मोहसीन याचा हाथ असल्याचे समोर आल्यावर त्याला अकोला जिल्ह्यातील हातगाव येथून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 38







