धारणी तालुक्यात वादळी पावसाच्या फटाक्यांने मोठा नुकसान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-नागरिक झाले बेघर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान-

निकेश विंचूरकर अचलपूर/चांदुर बाजार तालुका प्रतिनिधी : धारणी तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसा मुळे धारणी तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळ व अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसल्याने तालुक्यातील नागरिक बेघर झाले आहेत.कुसुमकोट, टेम्बली, घुटी, अंबाडी, बोब्दो, मांडवा, खारी, दाबीदा, टिटंबा, आकी या सोबतच तालुक्यात सर्वत्र प्रचंड नुकसान झाले. रस्त्याच्या कडेवरील हजारो झाडें पडून रस्ते बंद झाले आहेत. तसेच घरांची पडझड झाली, कित्येक घरांचे छते उडाली असून त्यांचा संसार उघड्यावर आला. घरातील धान्य व इतर सर्व साहित्य भिजले आहे. तर काही शेतामध्ये उन्हाळी मुंग कापून पडून असल्याने त्यावर धोधो पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने त्वरित घरांचे व शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी धारणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!