
विनापरवाना मुळासकट उपडून फेकली कित्येक हिरवीगार झाडे
तिन्ही प्रमुख जवाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय आवाराच्या मागील भागात वाढलेले मोठं-मोठे जुने हिरवीगार वृक्ष विनापरवाना मुळासकट उपडून फेकण्यात आले. यापैकी काही झाडे मुळापासून कापून सदर परिसर सपाट करण्याचा सपाटा येथे सुरु आहे. या परिसरात कुठलेही नवीन निर्माण प्रस्तावित नाही. येथील जुनी हिरवीगार झाडे कुणाला अडचणीचीही नव्हती तरी हि सारी झाडे कापून फेकल्या जात असून यासाठी वृक्षतोडीची कुठलीच परवानगीही घेण्यात आली नसल्याचे उघड झाले असल्याने भर उन्हाळ्यात झालेल्या या अवैध वृक्षतोडीस जवाबदार मुख्य कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता या तिन्ही प्रमुख जवाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी वन विभाग, अमरावती बनसंरक्षक (प्रादेशिक) यांचेसह मनपा आयुक्त देविदास पवार यांनाही सदर प्रकरणाची तक्रार देण्यात आली आहे. गेल्या २५ फेब्रुवारी २०२४ रोजीची सदर घटना असून या दिवशी मुख्य सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय अमरावती कार्यालय परिसर येथील मोठं-मोठ्या व हिरव्यागार झाडाची मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल करण्यात आली. जो सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही वर्क ऑर्डर दिल्याशिवाय काम करू देत नाही, त्याच बांधकाम विभागाने जवळपास अर्धा डझन जिवंत झाडे विनाकारण तसेच विनापरवानगीच उपडून फेकली असल्याचे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आपण न्यायासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तकारकर्त्याने सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






