ना डीपीएम, ना डॅम अन् कारभार जाम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : जवळपास दीड हजारावर कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय आरोग्य मिशनचा (एनएचएम) जिल्ह्यातील संपूर्ण डोलारा विस्कळीत झाला आहे. गत चार वर्षांपासून डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर (डीपीएम) तर वर्षभरापासून डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर (डॅम) ही दोन्ही महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘एनएचएम’चे प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजही अडचणीत सापडले आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हा आरोग्य यंत्रणेला पूरक आणि समांतर असा हा विभाग आहे. या विभागात परिचरापासून ते डॉक्टरांपर्यंतचे अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु चार वर्षांपासून डीपीएम नसल्यामुळे एकूणच एनएचएमची यंत्रणा पोरकी झाली आहे. सध्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) यांच्याकडे या यंत्रणेचा अतिरिक्त प्रभार आहे. शासनाचे आरोग्यविषयक अभियान, मेळघाटातील कुपोषण, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदी सर्वच बाबींकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे डीएचओंना एनएचएमसाठी पुरेसा वेळच देणे शक्य होत नाही. मार्च एण्डींगची धावपळीत डीपीएम आणि डॅम हे दोन्ही अधिकारी असते, हा भार इतर अधिकाऱ्यांवर आला नसता एनएचएममार्फत ३० पेक्षा अधिक कामे केली जातात. त्यासाठी डीपीएममार्फत वेळोवेळी कर्मचाऱ्यांना आदेश-निर्देश दिले जातात. परंतु सदर पदावर चार वर्षांपासून कुणीही अधिकारीच नसल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. डीएचओकडे पद गेल्यानंतर त्यांना तत्काळ या बाबीकडे लक्ष पुरवणे शक्य नसते. त्या कार्यालयाची व्याप्ती लक्षात घेता इच्छुक असूनही ते याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे वरील दोन्ही पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.

डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आणि डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यासाठीचे प्रस्तावही शासनाकडे पाठविले आहेत. आयुक्त (आरोग्य सेवा) यांच्याकडे पत्रव्यवहार करून या दोन्ही पदांसाठीचा पाठपुरावादेखील सुरू आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया थांबलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषदेला दोन्ही अधिकारी मिळण्याची शक्यता आहे.

– संतोष जोशी, प्रभारी सीईओ, जि. प. अमरावती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!