
अमरावती : केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारा फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर झाला. यात इयत्ता बारावीत येथील एडीफाय स्कूलची क्रती सिंघई ९८.२ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळविला. तर दहावीमध्येही पी. आर. पोटे-पाटील इंटरनॅशनल स्कूलची हेमांगी भुजाडे आणि वरुड येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा नेहांत मांगुळकर या दोघांनीही ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
जिल्ह्यात केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या बारावीची एकूण ६ विद्यालये तर दहावीच्या एकूण १६ शाळा आहेत. या सर्वच शाळांचा निकाल हा ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये अमरावती नवोदय विद्यालयातील अंजली कविटकर ही ९७.६७ टक्के गुण मिळवीत जिल्ह्यातून दुसरी तर नवोदय विद्यालयातून प्रथम आली आहे. तर, बारावीच्या निकालामध्ये पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा सृजन ताडे हा ९७.४० टक्के गुण मिळवत जिल्ह्यातून दुसरा आला आहे. यंदा सीबीएसई निकालात जिल्ह्यात अव्वल येण्याचा बहुमान मुलांना मिळाला असला, तरी निकालाची टक्केवारी बघितल्यास मुलीच आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
क्रती’ला व्हायचे आहे इंजिनिअर शहरातील एडीफाय स्कूलची विद्यार्थीनी कृती सिंघई हिने बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. क्रतीला इंजिनिअर बनायचे आहे. जेईईच्या परीक्षेत ९८.७५ पसेंटाइल गुण मिळाले असून ती जेईई अॅडव्हान्सची तयारी करत असल्याचे कतीने लोकमतशी बोलतांना सांगितले, क्रतीचे वडील रोहित सिंघई हे व्यावसायीक आहे तर आई प्रज्ञा सिंघई ही गृहिणी आहे. बारावीत मिळालेल्या यशाचे श्रेय कृती हे आपल्या शाळेला व संपूर्ण कुटुंबाला देते.
हेमांगीला व्हायचंय इंजिनिअर पी. आर. पोटे-पाटील इंटरनॅशनल स्कूलची हेमांगी भुजाडे हीदेखील दहावीमध्ये ९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. हेमांगीचे वडील नरेंद्र भुजाडे हे महावितरणमध्ये फिल्ड टेक्निशियनपदी कार्यरत आहेत. इंजिनिअर बनायचे हेमांगीचे स्वप्न आहे. त्यासाठी नागपूर येथे ‘जेईई ची तयारी सुरू केल्याचे हेमांगीने ‘z24news.dreamhosters.com’शी बोलताना सांगितले.
शेतकऱ्याचा मुलगा जिल्ह्यात प्रथम वरुड येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समधील विद्यार्थी नेहांत मांगुळकर याने सर्वाधिक ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. नेहांत हा वाडेगाव या छोट्याशा गावातील विद्यार्थी असून, त्याचे वडील नरेंद्र मांगुळकर शेतकरी आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






