
अमरावती : जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल ६७ हजार ७३५ वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले. त्या हाराकिरीबद्दल त्या वाहनचालकांना तब्बल ३.४३ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यातील सर्वाधिक कारवाई ही कार चालवताना सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध करण्यात आली. सीटबेल्ट न लावणाऱ्या १८ हजार ११० वाहनचालकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची इ चालान देण्यात आली. पैकी ११ हजार ७९९ वाहनधारकांनी २३ लाख ५९ हजारांचा दंड ऑन द स्पॉट भरला. तर ६३११ वाहनधारकांनी १२.६२ लाख रुपये दंडाकडे पाठ फिरविली, एकूण ८३ लाख ७६ हजार रुपये दंड हा सिग्नल जंप करणाऱ्या वाहनचालकांना आकारण्यात आला; मात्र त्यातील केवळ ३१६ जणांनी २ लाख भरले, तर १३१५७ जणांनी ८१ लाख ७६ हजार रुपये दंड भरलाच नाही. त्यामागोमाग वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १३७१० वाहनचालकांना ७५ लाख ८५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. पैकी केवळ १ लाख ४६ हजार रुपये वसूल झाले. वाहतूक पोलिसांकडून विनासीटबेल्ट, विनाहेल्मेट, स्पीड व्हायोलेटिंग, मालवाहतूक वाहनांमध्ये मानवी वाहतूक, सिग्नल तोडणे विनालायसन्स, वैध विमा नसणे राँगसाइड वाहतूक, फॅन्सी नंबरप्लेट नंबरप्लेट नसणे, ब्लॅक फिल्म, नो पार्किंगमध्ये वाहनांची पार्किंग, लेना कटिंग, ट्रिपलसीट, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह अशा विविध शीर्षाखाली वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई-चालानने दंड आकारला जातो. मात्र कारचालकांच्या तुलनेत अन्य वाहनचालकांनी ऑन द स्पॉट दंड भरण्यास फारसे स्वारस्य दाखविले नाही.
जानेवारी ते एप्रिलदरम्यान एकूण ६७ हजार ७३५ वाहनचालकांना ई-चालानकरवी दंड ठोठावण्यात आला. त्यातील सर्वाधिक कारवाई ही सीटबेल्ट न लावणाऱ्या चारचाकी चालकांवर करण्यात आली. – सतीश पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






