रुग्णालयातून कैदी पळाला, १२ दिवसांनी एमपीत मिळाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डातून पळालेल्या कैद्याला अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी शोधून काढले. त्याला मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील तुकईथड येथून १२ मे रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले. विलास नारायण तायडे (४२, रा. सुंबा, ता. संग्रामपूर, बुलडाणा) असे १२ दिवसांनंतर पकडल्या गेलेल्या कैद्याचे नाव आहे.

बलात्कार प्रकरणात येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या विलासवर इर्विनमधील कैदी वॉर्डात उपचार सुरू होते. या कैद्यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डबाहेर चार पोलिस अंमलदार तैनात होते. मात्र, त्याने तैनात पोलिसाच्याच उशीखाली ठेवलेली चाबी काढून वॉर्डचे कुलूप उघडले व पोबारा ठोकला. ही घटना ३० एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली होती. विलास तायडे याच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याच बलात्कार प्रकरणात न्यायालयाने सन २०२१ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याला अमरावती कारागृहात दाखल करण्यात आले होते. २८ एप्रिल २०२४ रोजी विलास तायडेला कारागृहातच डोक्याला दुखापत झाली होती. इर्विनमध्ये कैदी वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. या वॉर्डमध्ये कैदी असल्यास एक जमादार आणि तीन पोलिस शिपाई असे चार अंमलदार तैनात असतात. ३० एप्रिललासुद्धा चार पोलिस तैनात होते. त्या पळून गेल्याने त्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

वर्धा येथे घातला होता धुडगूस कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. फरारीच्या काळात त्याने वर्धा येथे एका तरुणीची छेड काढली होती, तर अन्य एकाला जबर मारहाणदेखील केली होती. त्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिस वर्धादेखील गेले होते. मात्र, तेथून तो मध्य प्रदेशात पळून गेला. सिटी कोतवालीचे पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव यांच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!