
अमरावती : पतीला वाचविण्यासाठी सरसावलेल्या गर्भवती महिलेचा विनयभंग करण्यात आला. १४ मे रोजी सायंकाळी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी १५ मे रोजी रात्री आरोपी
नरेश सोनवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.१४ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास तक्रारकर्त्या महिलेचे पती स्वतःच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी महिलेला घराबाहेरून जोरजोराने ओरडण्याचा व भांडण्याचा आवाज आला. त्यामुळे महिला घराबाहेर आली. त्यावेळी नरेश मोनवाल व आणखी काहीजण पतीला नारहाण करत असल्याचे महिलेला दिसले. त्यामुळे त्या पतीला बाचविण्याकरिता गेल्या असता नरेश मोनवाल याने त्यांचा विनयभंग करत नोटून दिले. पडल्याने त्यांचे पोट दुखू लागले. त्यामुळे त्यांना आधी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागला. त्यानंतर त्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आपण सात महिन्यांची गर्भवती असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






