कर्मचारी ठाम, आयुक्त म्हणाले, ‘नो वर्क नो पे’!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : सातव्या वेतन आयोगातील थकबाकी व महागाई भत्त्याची थकबाकी त्वरेने मिळावी, यासाठी महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघाने १४ मेपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, संप मागे न घेतल्यास प्रशासन ‘नो वर्क नो पे’चा निर्णय घेईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघाने गुरूवारी प्रशासनाला संघटनेची भूमिका पुन्हा एकवार सांगितली. तर दुसरीकडे आर्थिकपरिस्थितीच नाही, तर संघटनेची तीन टप्प्यातली मागणी मान्य तरी कशी करावी, असा प्रश्न प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आला. सबब,

गुरूवारी पुन्हा एकदा संघटनेसमोर प्रशासनाच्या वतीने आर्थिक सद्यःस्थिती ठेवण्यात आली. मात्र त्यातूनही तोडगा निघाला नाही.त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. शुक्रवारीदेखील संप सुरूच राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. संपामुळे सामान्यांची ससेहोलपट होत असताना अनेक कर्मचाऱ्यांनी एखादा तास थांबत सुटीचा आनंद घेतला.

तर दुसरीकडे आयुक्तांनी ‘नो वर्क, नो पे’चा इशारा दिल्याने अनेक जण आपआपल्या कार्यालयीन खुर्चीवर दिसून आले. मात्र त्यांनी आपण संपात सहभागी असल्याचे विचारणा करण्यास आलेल्यांना सांगितले.

सापत्न वागणूक का?आम्हाला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी संप करावा लागत आहे. तर दुसरीकडे केवळ १८ जणांना त्यांच्या ५५.४६ लाखांपैकी ४९.२९ लाख रुपये एकमुस्त दिले. त्यांना द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना एकमुस्त देत असाल, किमान आम्हाला तीन हप्त्यात तरी द्या, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

यांना मिळाली थकबाकी रमेश कडू, नीरज ठाकरे, उमेश फतवानी, बिट्ठ डेंडुले, गजानन गुर्जर, अमोल साकुरे, लीना अकोलकर, आशा बोबडे, अजय जे. चव्हाण, आशिष सातोकार, स्वप्निल जसवंते, प्रवीण इंगोले, कांचन राऊत, अर्चना इंगळे, प्रियांका रघुवंशी, कुणाल बांबल, सिद्धांत पडोळे व शेख हारुण या कर्मचाऱ्यांना ४९.२९ लाख रुपये अदा करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!