शहरात उष्माघाताचा आणखी एक बळी❗

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती रेल्वे स्टेशन-राजकमल पुलावर आढळला मृतदेह दक्ष प्रहरी न्यूज : गुरुवारी दुपारी शहरातील रेल्वे स्टेशन-राजकमल उडानपुलावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुवारी दुपारी उड्डाणपुलावर एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला. सदर (मृत) व्यक्ती हा बऱ्याच दिवसांपासून उड्डाणपुलावरच ठाण मांडून होता. अशी माहिती परिसरातील हॉकर्स विक्रेत्यांनी दिली. पोलिसांनी सदर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सदर मृतदेह जिल्हा शवागारात ठेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!