अग्नीशस्त्राचा गैरवापर झाल्यास खैर नाही❗

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पोलीस आयुक्तांचा ईशारा; मनाई आदेश लागू

अमरावती : शहरात शांतता व सुव्यवस्था बाधित करण्याच्या दृष्टीने शस्त्र परवानाधारकाकडुन शस्त्राचा गैरवापर होउ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अग्नीशस्त्राचा गैरवापर झाल्यास खैर नाही, असा सावध इशारा पोलीस आयुक्तालयाने जाहीर केला.

16 मार्च रोजी लोकसभा निवडणुक 2024 चा मतदान कार्यक्रम पार पडला. आता 4 जून रोजी मतमोजणी राहणार आहे. या कालावधी दरम्यान अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था बाधित करण्याच्या दृष्टीने शस्त्र परवानाधारकाकडुन शस्त्राचा गैरवापर होउ शकतो. त्यामुळे हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा मनाई आदेश जो समाज दिर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परिपाट यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हकदार आहे. त्या समाजाला लागु राहणार नाही. तथापी अशा समाजातील व्यक्तीं हिसांचारात सहभागी असल्याचे आढळुन आल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा व्यकतीची शस्त्रास्त्रे अडकविण्याचा पोलीस विभागाला अधिकार राहणार आहे.

शहर पोलीस आयुक्तालय श्रेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण होणार नाही यादृष्टीने पोलीस आयुक्त रेड्डी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम-144 (1) (2) व (3) अन्वये लोकसभा निवडणुक 2024 चा कार्यकम जाहिर झाल्यापासुन ते मतमोजणी निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत अमरावती शहरात कोणत्याही शस्त्र परवाना धारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध केलेला आहे. या अनुषंगाने मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांनी लोकशाही भवन परिसरात तगड्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

सोशल मिडिया पोस्टवरही करडी नजर
विजयी मिरवणुक दरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी/बॅनर लावणे, आक्षेपार्ह गाणे वाजविणे, देखावे प्रदर्शित करणे व सीडी/कॅसेट बाळगणे, डॉल्बी साउंड सिस्टीमचा वापर करणे, शस्त्र व ज्वलनशिल पदार्थ बाळगणे/प्रदर्शन करणे, मनुष्याचे जिवितास, आरोग्यास, सुरक्षिततेस धोका होईल किंवा गर्दी होवून हाणामारी होईल किंवा जातीय/धार्मिक एकोपा आणि सलोखा भंग होण्यासारखे कृत्य करुन सोशल मिडीयावर प्रचार व प्रसार करणे इत्यादी असे सर्व प्रकारचे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. जो कोणी यानियमांचे उल्लंघन करील तो इसम तथा शस्त्र परवाना धारक दंडणीय कार्यवाहीस पात्र राहील. सदर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) (2) (3) अन्वये आदेशातील तरतूदीचा भंग करण्यास मनाई करणारा आदेश 15 मार्च ते 5 जूनपर्यंत अंमलात राहील.

कठोर कारवाईचे प्रावधान सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 व इतर प्रचलित कायद्याअन्वये शिक्षापात्र अपराध केला असे मानण्यात येईल. अमरावतीकरांनी शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवणेबाबत नागरिकांनी पोलीसांना सहकार्य केलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुक काळात सुध्दा अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

——————————————

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!