
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात काही शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावल्याचे दर्शवून लाखोंचा मलिदा चाखल्याचे वास्तव समोर पुढे आले आहे. अधिकारी कर्मचारी गैरहजर असताना उपस्थित दर्शवून त्या दिवसाचे वेतन काढण्यात आले आहे. सुटी कामभत्ता घोटाळा याविषयी z24news.dreamhosters.com’ कडे हजेरीपत्रकाचे प्रपत्र हाती लागले आहे.
अमरावती विद्यापीठामध्ये असलेला अत्यल्प कर्मचारी वर्ग लक्षात घेता कर्मचारी परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यालयीन आदेश क्र. अवि १/१०२/१९३२/१९९४ दिनांक २ मे १९९४ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार ४४ दिवसांच्या मर्यादित २२:२२ या प्रमाणात वेतन व बदली अर्जीत रजा करण्यात येते. याकरिता दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात येते. २०२४ – २५ च्या अर्थसंकल्पामध्ये ३० लाख रूपये एवढी तरतुद करण्यात आलेली आहे. कार्यालयीन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी कार्यालयात यावयाचे आहे. याकरिता कुलसचिवांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु या सुटी कामभत्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करण्यात येते. बऱ्याच विभागामध्ये प्रपत्रामध्ये नाव भरण्यात येते. परंतु प्रत्यक्षात कर्मचारी कार्यालयात न येता दुसऱ्या दिवशी विभागातील नोंदवही व हजेरी पत्रकांवर स्वाक्षरी करण्यात येते. कुलसचिवांची पूर्व परवानगी न घेता २- ३ महिन्यानंतर कार्योत्तर मान्यता घेण्यात येते, असा हा अफलातून कारभार सुरू आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी कार्यवाहीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
पाच ते दहा मिनिटांची उपस्थिती काही कर्मचारी फक्त ५ते १० मिनिटांकरिता येऊन स्वाक्षरी करून परत जातात. आर्थिक वर्षामध्ये पूर्ण ४४ सुट्या कशा जमा होतील, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चढा-ओढ लागलेली असते.
सर्वसाधारणपणे एका दिवसाला वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांना ३ हजार रूपये वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना ४ हजार रूपये व वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना ५ते ८ हजार मिळते. तसेच बदली रजा सुध्दा मिळतात. सुटीच्या दिवशी कार्यालयात वृत्ती कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येते. परंतु विद्यापीठातील दैनंदिन वेतनातील कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कर्तव्यावर यायचे असल्यास विभागप्रमुखांना कळवावे लागते. त्यानंतर संबंधित विभाग प्रमुखांकडून शिफारस पाठविली जाते, नंतर त्या दिवसाचे वेतन अदा करण्यात येते. ही विद्यापीठात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्कीम आहे. –डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव अमरावती विद्यापीठ.
दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करा सुटीच्या दिवशी न येता दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी करून विद्यापीठाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती होऊन घेणे प्रशासनास सहज शक्य आहे. तसेच इतर सुट्याबाबत विद्यापीठ प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. त्यापुढे मागील २-३ महिन्यामध्ये सुटीच्या दिवशी न येता किंवा दुसऱ्या दिवशी स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रपगांवरील नोंदी नुसार मुख्य प्रवेशद्वावरील सीसीटीव्ही मधून खात्री करून चुकीच्या पद्धतीने आर्थिक लाभ घेणाऱ्यांवर विद्यापीठाने शिस्तभंगाची कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






