पुरवठा, वितरक नेमण्याची थाप उद्योजकाला २० लाखांचा गंडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : स्टॉकिस्ट व वितरक नेमण्याची बतावणी करून परतवाडा येथील ३१ वर्षीय उद्योजकाला २० लाख रुपयांनी चुना लावण्यात आला. २७ जून ते ९ ऑगस्ट २०२३ दरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी १६ मे रोजी सुमित भुस्कडे (३१, परतवाडा) यांच्या तक्रारीवरून आरोपी विनय त्यागी, निशांत तिवारी, शैलानंद सवाई, संजय दुबे, साक्षी, क्षिप्रा व कॉल अटेंडंस महिलेविरुद्ध फसवणुकीचे गुन्हा नोंदविला.

सुमित यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये शासनाकडे कंपनी नोंदणीबद्ध केली. कंपनीच्या माध्यमातून ते पाणी व त्यासंबंधी इतर प्रोजेक्टसाठी काम करतात. जून २०२३ मध्ये इंटरनेटवर सर्च करत असताना त्यांना नेक्सजेन एनर्जिया प्रा.लि. या कंपनीच्या जाहिराती सोशल मीडियावर दिसून आल्या. त्यांना त्या कंपनीकडून कॉल आला. आमची कंपनी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रदान करेल. त्याकरिता तुम्ही प्लान्ट तयार करा. आम्ही मशनरी, मटेरियल पुरवू व प्रॉडक्ट्ससुद्धा कंपनी खरेदी करेल, अशी बतावणी केली. त्यानंतर विनय त्यागी नामक इसमाने कॉल करून पुन्हा गॅरंटी दिली. प्रत्येक महिन्याला कंपनीच तुम्हाला चार लाख रुपये उत्पन्न देईल, अशी बतावणी आरोपींनी केली. मात्र धनादेश पाठविल्यानंतर त्यांना फसवणुकीची जाणीव झाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!