
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराळा, खोडगाव व सुर्जी येथे विनापरवानगी डीजे वाजविल्याबाबत पोलिसांनी तीन डीजे चालकांवर कारवाई केली. परिवहन विभागाने त्या तिघांवर १ लाख ८ हजार रुपये दंड देखील ठोठावला. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याबाबत १४ एप्रिल रोजी डीजेच्या तीन वाहनांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. एमपी १३ जीबी ३५५४, एमएच ४३ एडी ०२२६ व एमपी ०९ केडी ७५७९ या तीन डीजे वाहनांची तपासणी करण्यात यावी, असे पत्र अंजनगाव पोलिसांनी आरटीओला दिले. तपासणी केली असता डीजेची वाहने मॉडीफाय केलेली व चालकांकडे वाहनाची कागदपत्रे नसल्याने तिन्ही डीजे वाहनचालकांवर १ लाख ८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई झाली.
डीजेचालकांची बैठक ३ मे रोजी अंजनगाव ठाण्यात डीजे चालकांची बैठक घेण्यात आली. ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे डीजे चालकांनी कायद्याचे पालन करून मानवी जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






