मेळघाट वन्यजीव विभागात अवैध वृक्षतोड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

परतवाडा मेळघाट वन्यजीव विभागातील जामली (वन्यजीव) परिक्षेत्रांतर्गत टेंम्बुसोंडा नियत क्षेत्रामध्ये सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. यात साग चरपट, साग पाटल्या, साग बल्ल्या मिळून एकूण २८ नग जप्त केले. ०.७४३ घनमीटर असलेल्या या लाकडाची किंमत ६६ हजार ५९४ रुपये दाखविण्यात आली आहे.

अग्निरक्षक रोजंदारी मजूर सुरेश मोती कासदेकर व सोनकलाल चंपालाल दहीकर यांच्या घराच्या आवारातून हे अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे.

रोजंदारी संरक्षण कॅम्प मजूर प्रवीण तुकाराम कासदेकर, शालिकराम भैय्या दहीकर, तेजीलाल चंपालाल दहीकर यांनी त्यांना अवैध वृक्षतोड प्रकरणी सहकार्य केले. या अनुषंगाने भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१) फ इ व ४१, ४२, ५२ अन्वये २८ एप्रिलला प्रथम गुन्हा जारी करण्यात आला आहे. मेळघाटातून वाढती अवैधरित्या लाकूड वाहतूक थांबविणे हे वनविभागापुढे मोठे आव्हान ठरणारे आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!