
मोर्शी : हाय ब्लडप्रेशर ही सध्या जवळपास सर्वांमध्येच आढळून येणारी समस्या आहे. अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहारामुळे अगदी कमी वयातच अनेकांना हाय ब्लडप्रेशरची लक्षणं दिसू लागतात. हाय ब्लड प्रेशरच्या समस्येला वाढलेले वजन कारणीभूत ठरते तसेच प्रत्येक वयोगटात हाय ब्लडप्रेशरची समस्या वाढत आहे. जागतिक हायपर टेन्शन दिनाच्या अनुषंगाने त्याबाबत माहिती सामान्य नागरिकांना होणे आवश्यकच आहे. रक्तदाब (ब्लड प्रेशर) १४०/९० पेक्षा जास्त असल्यास त्याला हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) मानले जाते. वयानुसार ही रेंज बदलत राहते. जर हाय ब्लडप्रेशर मर्यादेपलीकडे वाढला, तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणजे, हृदय आपल्या शरीरभोवती गरजेपेक्षा अधिक वेगाने रक्त पंप करते. अधिक वेगाने आलेले हे रक्त रक्तवाहिन्यांमधून जाण्यासाठी हृदय, मेंदू, किडनी, डोळे, शरीराच्या इतर अवयवांवर अतिरिक्त दबाव पडतो.
सर्व प्रयत्न करूनही जर बीपी कमी होत नसेल, तर योग्य उपचार करा. कारण कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा. पथ्य पाळा आणि काळजी घ्या.- डॉ. सागर श्रीराव, मोर्शी
हे करा उपाय जर तुम्हाला रक्तदाब 1) नियंत्रणात ठेवायचा असेल, तर जंक फूडचं सेवन बंद करा. फक्त घरी शिजवलेलं निरोगी अन्न खा. तुमच्या आहारात धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ आणि काजू यांचा समावेश करा. सोडा आणि मीठ यांचे सेवन कमी करा. 2) दररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.3) जास्त वजन व तणाव नियंत्रित करा. मद्यपान, धूम्रपान टाळा, यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






