करिनाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : धुरांचे लोट, गरम टाईल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपले अपार्टमेंट आगीपासून वाचविण्याच्या ध्येयाने धाडसाचा परिचय देणाऱ्या करीना थापा (१७) हिचे कौतुक होत आहे. तिने सिलिंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला.

कठोरा परिसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलशेजारच्या जय अंबा अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच करिनाने किचनचे सिलिंडर बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आणि सर्व रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

अपार्टमेंटच्या ‘बी-विंग’मधील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करीत असलेल्या करिनाने फ्लॅटचे दार ठोठावले. प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून लगेच वडील अशोक थापा यांना या घटनेची माहिती दिली.

एव्हाना फ्लॅटला आग लागली. ती तत्काळ विझवण्याच्या दृष्टीने शेजारच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ती आत शिरली. आग आणि धुराचे लोट येत असतानाही शिक्षक स्वप्निल मोहोड यांच्या मदतीने बादल्यांनी पाण्याचा मारा करत तिने सिलिंडरभोवती आग आटोक्यात आणली व ते सिलिंडर बाहेर काढले. फ्लॅटधारक मोनाली सिरसाट तोपर्यंत घटनास्थळी पोहोचल्याने मुख्य दरवाजा उघडला गेला. मात्र, धूर व गरम हवेचे लोट येत असल्याने त्यांना काही सूचत नव्हते.करिनाची आई निशा थापा आणि सिरसाट यांनी हॉलमधील सोपे काढले. खिडक्या, दारही उघडले. तोपर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.

अपार्टमेंटचे केअर टेकर असलेले नेपाळचे निवासी अशोक थापा यांची करिना ही कन्या. पत्नी आणि दोन मुलींसह केअर टेकर म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या थापा कुटुंबीयांनी या अपार्टमेंटला आपले घर मानले आहे. अमरावतीतच अकारावीचे शिक्षण पूर्ण करणारी करिना आपल्या आईला कामात मदत करीत असून अपार्टमेंटमध्ये घरकाम करते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!