ती आली… थोडी थबकली अन् सुरक्षित रस्ता ओलांडून गेली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : परतवाडा, घटांग, धारणी मार्गावर रात्री आणि दिवसाही जड आणि प्रवासी वाहतुकीची वर्दळ असते. अशावेळी रस्ता ओलांडताना अपघात हा ठरलेलाच, पण, मंगळवारी सकाळी एका अस्वलीने रस्त्यावरील वाहनांचा अंदाज घेतला आणि त्यानंतर रस्ता ओलांडला. याद्वारे रस्ता ओलांडण्याचा वस्तुपाठच तिने दिला. तथापि, दिवसाढवळ्या अस्वलीच्या दर्शनाने वाहनचालक भेदरले होते. दररोज अनेक मार्गावर अपघाताची मालिका सुरू असताना त्याच बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या माणसांना रस्ता कसा ओलांडायचा, त्याचा नियम ते अस्वल अलगद सांगून गेले. मेळघाटचा वाघापेक्षा अस्वल भारी मेळघाटातील रहिवासी वाघापेक्षा अस्वलाला घाबरतात. कारण माणूस दिसताच अस्वल हल्ला करतो. जंगलात जाताना किंवा रस्त्याने जाताना त्याबाबत सुरक्षितता मेळघाटी जपतात. घटांगनजीक रस्त्यावरून अस्वल गेले खरे, परंतु चारचाकी वाहनधारकांनी सुरक्षितता म्हणून वाहनाचे सर्व काच लावून घेतले होते. ते जंगलात गेल्यावरच श्वास रोखून बसलेल्या तोंडून चित्कार निघाला, वाघापेक्षा अस्वलाला घाबरतो, हे निर्विवाद सत्य. चिखलदरा तालुक्यातील घटांग, सेमाडोह परिसरात अस्वलांची संख्या अधिक आहे. मेळघाटात वाघासह इतरही प्राणी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विविध वन्यप्राण्यांचे दर्शन रस्त्यावरच ये-जा करणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांना होत आहे. घटांग गावानजीक अस्वलाचे दर्शन अनेकांसाठी कौतुकाचा विषय नक्कीच ठरले.

वाघापेक्षा अस्वल भारी मेळघाटातील रहिवासी वाघापेक्षा अस्वलाला घाबरतात. कारण माणूस दिसताच अस्वल हल्ला करतो. जंगलात जाताना किंवा रस्त्याने जाताना त्याबाबत सुरक्षितता मेळघाटी जपतात. घटांगनजीक रस्त्यावरून अस्वल गेले खरे, परंतु चारचाकी वाहनधारकांनी सुरक्षितता म्हणून वाहनाचे सर्व काच लावून घेतले होते. ते जंगलात गेल्यावरच श्वास रोखून बसलेल्या तोंडून चित्कार निघाला,

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!