
अमरावती : मनपातील जीएडीच्या तत्कालीन कार्यालय अधीक्षक लीना अकोलकर यांच्यावर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघाने आयुक्तांकडे केली आहे. सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी याबाबत १५ मे रोजी आयुक्तांना पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले आहे.
वरिष्ठ लिपिक असलेल्या अकोलकर यांच्याकडे आधी कार्यालय अधीक्षक व त्यानंतर त्याच विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पदाचा दुरूपयोग करत अनावश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तेही पूर्णवेळ लावून घेतले.
जीएडीच्या तत्कालीन अधीक्षकांविरोधात संघटनेची तक्रार यापूर्वीच प्रशासनाला प्राप्त आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या स्तरावर चौकशी सुरु आहे.
– श्यामसुंदर देव, उपायुक्त, महापालिका
संघटनेच्या याआधीच केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मी प्रशासनाकडे माझा खुलासा सादर केला आहे. माझे म्हणणे लेखी मांडले आहे. – लीना अकोलकर, वरिष्ठ लिपिक, मनपा
त्यात त्यांच्या जवळच्या नातेवाइकांचादेखील समावेश आहे.त्या सर्वांना कार्यमुक्त करून अकोलकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अकोलकर यांनी स्वतः सहायक आयुक्त असताना सातव्या जीएडीच्या तत्कालीन अधीक्षकांविरोधात संघटनेची तक्रार यापूर्वीच प्रशासनाला प्राप्त आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या स्तरावर चौकशी सुरु आहे.
– श्यामसुंदर देव, उपायुक्त, महापालिका
संघटनेच्या याआधीच केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मी प्रशासनाकडे माझा खुलासा सादर केला आहे. माझे म्हणणे लेखी मांडले आहे. – लीना अकोलकर, वरिष्ठ लिपिक, मनपा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






