
परतवाडा : अचलपूर नगर परिषद क्षेत्रात एकही होर्डिंग अधिकृत नाही. या शहरातील नियमबाह्य अनधिकृत होर्डिंगधारकांना नगर परिषदेने नोटीस बजावल्या आहेत. यात इमारतींवरील अनधिकृत होर्डिंगचा समावेश आहे.
शहरातील काही अनधिकृत होर्डिंग अचलपूर नगर परिषदेने पोलिसांच्या उपस्थितीत यापूर्वीच काढले आहेत. यानंतरही काही होर्डिंग नव्याने लागले आहेत. वास्तविक, नगर परिषदेने शहरात होर्डिंगकरिता सात जागा निर्धारित केल्या आहेत. त्याकरिता निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. यादरम्यान निर्धारित जागेवर होर्डिंग उभे करण्याकरिता अजनपर्यंत कोणीही पुढे आलेले नाही. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शहरात खऱ्या अर्थाने जमिनीवर अधिकृत होर्डिंग उभे राहू शकणार आहेत.
दरम्यान, शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबत नगर परिषदेने सर्वेक्षण सुरू केले असून अधिकाऱ्यांमार्फत नव्याने माहिती गोळा केली जात आहे. नियमबाह्य अनधिकृत होर्डिंग नव्याने आढळून आल्यास ते केवळ काढले जाणार नसून, अशांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






