
अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्यामुळे नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडले आहेत. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली. अशातच रोजच्या जेवणात आवर्जून वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये असा आहे. गत दोन महिन्यांपासून दर वाढत आहेत. नवीन लसणाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका यंदा जानेवारी महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकालाही फटका बसला आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. परिणामी, गोबी, मिरची, वांगे, बटाटे, भेंडीचे भाव वाढले आहेत. जिल्हाभरात अवकाळीचा कहर सुरु असल्याने सर्वसामान्यांसह बळीराजाही हवालदिल झालाआहे.
‘या’ भाज्या स्वस्त सध्या भाजीपाल्यामध्ये भेंडी, वांगी,कोंथिबीर, टोमॅटो, फुलगोबी, काकडी, गाजर, मुळा, दोडका आदी भाजीपाल्यांचे भाव स्वस्त आहेत.
‘या’ भाज्या महाग अवकाळीमुळे सध्या लसूण, मिरची, अदक, शेवग्याच्या शेंगा, मेथी, पालक, करडईची भाजी, शेपू आदींचे भाव गगनाला भिडले आहेत.
पालेभाज्याही महाग अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे मेथी, चवळी भाजी, शेपू-पालक या भाज्या महाग झाल्या आहेत.
भाजी विक्रेते म्हणतात..वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पालेभाज्यांसह अन्य भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.गणेश मेश्राम, भाजी विक्रेता
ज्यांनी भाजीपाला लावला होता, त्यांनी शेत मोकळे केले. त्यामुळे लसणाबरोबर भाजीपाल्याचे भाव वाढले.
– विजय वानखडे, बटाटे-लसूण विक्रेता
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






