महापालिका ‘फोकस्ड ऑन रोड’ धोकादायक होर्डिंग्ज निघू लागले !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : घाटकोपरच्या घटनेपासून धडा घेत अमरावती महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. बाजार परवाना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून संयुक्तपणे सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान रुक्मिणीनगर व रवीनगर परिसरातील काही होर्डिंग्ज काढण्यात आले.

महापालिकेकडून शनिवारीदेखील ही कार्यवाही सुरूच राहणार आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून जितके होर्डिंग्ज काढता येईल, तितकी तातडीने काढण्याचे निर्देश आयुक्त देवीदास पवार व उपायुक्त श्यामसुंदर देव यांनी दिले होते. तर इमारतीवरील महाकाय अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यसाठी बाह्ययंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.

मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोलपंपावर भले मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला. १३ मे रोजी झालेल्या या दुर्घटनेने अख्खे राज्यातील धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.घाटकोपरच्या घटनेनंतर लगेचच राज्याच्या नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १४ मे रोजी महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी तातडीची बैठक घेतली.

बाजार परवाना विभागाला दिशानिर्देश दिले. त्यात १४७ होर्डिंग्ज नियमानुकूल करण्यात यावे, असे प्रस्ताव जाहिरात संस्थांनी दिले आहेत. तर महापालिकेकडे कुठलाही प्रस्ताव सादर न करणारे १५७ अनधिकृत होर्डिंग्जधारक असल्याची माहिती समोर आली.

नागपूरच्या आमदाराचे पत्र अमरावती शहरात लागलेली काही जाहिरात संस्थांची फलके, होर्डिंग्ज काढू नयेत, यासाठी थेट नागपूरच्या एका आमदाराने अमरावती महानगरपालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याचे समोर आले. सहजासहजी जे निघू शकतात, ते होर्डिंग्ज काढण्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली. यात बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण विभागाचे श्याम चावरे, योगेश कोल्हे व दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!