अन्यथा पब, क्लबसमोर नागा साधूंसोबत आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : अंबानगरीच्या संस्कृतीला काळिमा फासू पाहणारे शहरातील सहाही पब, क्लब महिनाभरात बंद करावेत, अन्यथा नागा साधूंना सोबत घेऊन त्याच पब, क्लबसमोर, त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, त्यावेळी कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा शहरातील हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी तरुण नेत्यांनी दिला.

युवा सेनेचे राहुल माटोडे, युवक कॉग्रेसचे समीर जवंजाळ, शक्ती महाराज, प्रहारचे बंटी रामटेके, भीम आर्मीचे रीतेश तेलमोरे, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, नंदू काळे, संजय शेटे, विक्रम तसरे, निखिल देशमुख, राम पाटील, शुभम शेगोकार, मुन्ना वसू, केवल हिवराळे, अंकुश आठवले, योगेश बुंदिले आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पब, क्लब चालू देणार नाही, गाठ आमच्याशी आहे, असा इशारा दिला. स्टेट एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील प्रसंगी धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दोन पब बंद?जुन्या बायपासवरील महेश छाबडा नामक परमिट रूमधारकाने गुरुवारी पत्रकारपरिषद घेऊन आपल्या फ्रैंक क्लबला बंद करत असल्याची घोषणा केली. तर, तापडिया मॉलमधील एजंट जॅक बार अँड फॅमिली रेस्टारंटचे अनमोल अरोरा व सागर भट्टी यांनी १७ मे रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून यापुढे आपल्या आस्थापनेत कुठल्याही प्रकारचा पब किंवा तरूण तरुणींसाठी नाचगाण्याची सुविधा नसेल, असे स्पष्ट केले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!