विदर्भाच्या नंदनवनात मौसम अंजाना… रस्ता बेगाना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : सर्वत्र अवकाळी पावसाचा कहर सुरू असताना विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी दुपारी ३:३० वाजता सोसाट्याचा वारा सुटला. गारपीट झाली आणि धो-धो पाऊसही कोसळला. त्यामुळे लख्ख उन्ह असलेल्या पर्यटनस्थळावर क्षणातच मोसम अंजाना… आणि धुक्यामध्ये रस्ता बेगाना… म्हणायची वेळ पर्यटकांवर आली. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मुसळधार पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.

रविवारी दुपारी ३:३० वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुटला, ढगात गडगडाट सुरू झाली, तुरळक पावसानंतर चण्याच्या आकाराएवढी दहा ते पंधरा मिनिटे गारपीट झाली. त्यानंतर पावसाने मुसळधार अशी हजेरी लावली. पुन्हा पाऊस थांबला आणि कोवळे उन्ह निघायला सुरुवात झाली. मात्र, क्षणात पुन्हा पाऊस कोसळला. काही क्षण धोके पसरले आणि निघून गेले. या वातावरणात आलेल्या पर्यटकांना विदर्भाच्या नंदनवनाचा आल्हाददायक असा क्षण अनुभवायला मिळाला.

जिल्ह्यात इतरत्र वादळी वारे अमरावती शहरासह जिल्ह्यातील धारणी, धामणगाव रेल्वे, वरूड, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी ढगांची दाटी झाली. वेगवान वारे सुमारे एक ते दीड तास वाहत होते. तथापि, पाऊस कोसळला नाही.

आठवडी बाजार आणि पळापळ…

चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील दहा-पंधरा आदिवासी पाड्यांतून आदिवासी पालेभाजी इतर साहित्य खरेदीसाठी येतात. रविवारी अचानक धो-धो कोसळलेल्या अवकाळी पावसाने बाजारही पूर्णतः धुऊन काढला. विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली.

तलाव मात्र कोरडे आमझरी येथील बोअरवेलवरून चिखलदरा येथे दोन दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. स्थानिक सक्कर तलाव आणि कालापाणी तलावात केवळ पाण्याचे डबके तेवढे राहिले आहे. बागलिंग प्रकल्पातून पाइपलाइनचे काम पूर्ण होईस्तोवर पर्यटनस्थळाची वीस वर्षांपासून कोरड कायम राहतील.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!