पतीला धमकी देत पत्नीवर बलात्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : एका महिलेच्या घरात शिरून तिच्या पतीला धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. वरूड तालुक्यातील शेंदुरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत १७ मे रोजी उशिरा रात्री १२:३० ते १ च्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी १८ मे रोजी सकाळी ७:४८ च्या सुमारास आरोपी प्रतीक तुळशीराम कुसराम (२६, रा. ता. वरूड) याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी ३० वर्षीय महिला पतीसह राहते घरी हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी आरोपी रात्रीच्या सुमारास तिच्या घरात शिरला. तिचे तोंड दाबून तिला व तिच्या पतीला मारून टाकण्याची धमकी दिली. तथा तिला जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. अचानक घडलेल्या त्या घटनेमुळे ती नखशिखांत हादरली. तिने घडलेला प्रकार पतीच्या कानावर टाकला. तथा शेंदुरजनाघाट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पीडितेची फिर्याद नोंदवून घेतली. तथा एक पोलिस पथक आरोपीच्या शोधार्थ पाठविण्यात आले. त्याला अटक केल्यानंतर शनिवारी दुपारी वरूड न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!