अमरावती आयपीएलमधील सनराईझर्स हैदराबाद व किंग्स एलेव्हन पंजाब या संघात रविवारी दुपारी खेळल्या गेलेल्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेताना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका सट्टेबाजाला अटक करण्यात आली. पोलिस आयुक्तांच्या सीआययू ने रविवारी सायंकाळी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील श्री कॉलनीमध्ये ती कारवाई केली. निलेश वैरागडे (३१, हिंगणघाट) असे अटक आरोपीचे नाव आहे.
आरोपी बुकीकडून १.२० लाख रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला. एका अनधिकृत अॅपद्वारे तो आयपीएल मॅचवर खयवाडी व लगवाडी करीत असल्याची माहिती सीआययूला मिळाली. जप्त मोबाईलमध्ये सट्टयाचा व्यवहार व बॅलन्स दिसून आले. श्री कॉलनी भागात भाड्याची खोली घेऊन तो ऑनलाइन सट्टा खेळवित होता. सीआययुप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या नेतृत्त्वात सुनिल लासूरकर, अतुल संभे, राहुल ढंगेकर यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






