मंगेश वरखेडे नवे प्रभारी कुलसचिव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचा कुलसचिव पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला. त्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे कुलसचिव पदाचा पदभार प्रशासन विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखडे यांनी स्वीकारला.

कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी वरखडे यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा पदभार देण्याचे आदेश दिले. वरखेडे यांनी पदभार स्वीकारताच संविधानिक अधिकारी, शैक्षणिक व विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी कौतुक केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!