भरधाव ट्रकची उभ्या ट्रेलरला धडक; दोघे गंभीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

तिवसा : पंक्चर झालेल्या ट्रेलरचे टायर खोलत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसानजीक हा अपघात घडला. चालक आकाश सहारे (३५) व सहायक भानुदास वाकपंजार (४५) अशी जखमींची नावे आहेत.

एमएच २७ सीएफ २९८२ क्रमांकाचा ट्रक नागपूरला डाक पार्सल घेऊन जात होता. पंक्चर झालेल्या ट्रेलर (जीजे ३६ व्ही ३७२५) जवळ वाहन नेताच ट्रकचालकाचे संतुलन बिघडल्याने तो भरधाव ट्रक थेट ट्रेलरला धडकला. यामधे ट्रकचा दर्शनी भाग चक्काचूर झाला, तर ट्रकचालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी होऊन केबिनमध्येच अडकले. घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!