वास्तूला म्हणून सांगून गेली, घरी परतलीच नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : मैत्रिणीकडे वास्तू असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी परस्परच शेगावला गेली. मात्र तेथून घरी परतलीच नसल्याची बाब गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. १७ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास ती घराबाहेर पडल्याचे १८ मे रोजी पहाटे गाडगेनगर पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आर्यन नागरे (१९, रा. रेवसा) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यातील घटनास्थळ हे गाडगेनगरमधील एक लेडीज होस्टेल दर्शविण्यात आले आहे.

मैत्रिणीकडे वास्तू आहे, असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीला कॉल केला असता आपण सकाळी घरी येत असल्याचे तिने आईला सांगितले. मात्र तिच्या तिच्या मैत्रिणींना विचारपूस केली असता ती मित्र मैत्रिणींसोबत शेगाव येथे गेल्याचे त्यांना समजले. तेथून आल्यावर संशयित आर्यनने अन्य मुलींना घरी सोडले व तो त्या मुलीला सोबत घेऊन गेला, अशी – माहिती देखील महिलेला मिळाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!