अमरावती : जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार असून, यात हात-पाय लुळे पडण्यासारखी लक्षणे दिसतात. याकडे थोडेसे दुर्लक्ष केले, तरीही ते जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच निदान, योग्य उपचार व आरोग्यदायी जीवनशैलीतून या संकटावर मात करता येणे शक्य आहे.
वयाच्या दीड वर्षानंतर बाळातील चालण्यात किंवा हात-पाय हलवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास म्हणजे वेळीच जीबीएसवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे, अशी लक्षणे दिसून येतात, तर या आजाराचे प्रमाण लहान बाळांमध्ये अधिक दिसून येत असून, बुलियन बॅरी सिंड्रोम एक वेगाने प्रगतिशील पॉलिन्यूरोपॅथी आहे, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रो मायोग्राफी आणि सीएसएफ विश्लेषण यांसारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक उपचार करण्याचा सल्ला तज्ज्ञ सांगतात. आजारासंदर्भातील त्यामुळे या लक्षणे आढळल्यानंतर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास या आजारातून सावरणे कठीण होते.
यामुळे कायमचे अपंगत्व, तसेच जीवालाही धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीचउ पचार करणे गरजेचे आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






