डीजी लॉकरमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परीक्षेला प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिट आऊट) घेता येईल. डीजी लॉकरमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित संकेत स्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एकत्रित निकाल उपलब्ध असून, विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

१६ कॉपीबहाद्दरांवर कार्यवाही, वर्षभर परीक्षेपासून वंचित

बारावीच्या परीक्षेत यंदा १७ विद्यार्थी कॉपी करताना पकडण्यात आले होते. अशा कॉपीबहाद्दरांवर नियमानुसार कारवाईसाठी चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया गोपनीय ठेवली जात असून, केंद्रावरील संबंधितांचे बयाण आणि विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली जाते. १७ पैकी एक विद्यार्थी निदर्दोष सिद्ध झाला असून १६ विद्यार्थ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेपासून १६ जण वर्षभरासाठी वंचित राहणार आहेत.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!