
अमरावती इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला, त्यात अमरावती जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.३३ टक्के असून, मुलींनीच निकालात आघाडी घेतली आहे. वाणिज्य शाखेतून येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची शरयू मोहोड हिने ९७.८३ टक्के, तर विज्ञान शाखेतून येथील ब्रिजलाल बियाणीची मोहिशा बत्रा हिने ९६,८३ टक्के गुण पटकावत जिल्ह्यात भरारी घेतली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकालात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात बारावीचे। परीक्षार्थी असलेले ४४७ कनिष्ठ महाविद्यालये असून, १३६ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. अमरावती जिल्हह्यातून ३४,५८५विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १८,०५२ मुले तर १६,५३३ मुलींचा समावेश होता. त्यापैकी ३१,९३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात १६,२११ मुले तर १५,७२३ मुलींचा समावेश आहे. निकालात मुले ८९८० टक्के आणि मुली ९५.१० टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत. अमरावती शहर वगळता ग्रामीण भागातून बारावीच्या परीक्षेत ९५ टक्क्याच्या वर गुण मिळविण्याच्या यादीत विद्यार्थी झळकले नाहीत. गतवर्षी बारावीचा निकाल ८९.८४ टक्के एवढा होता. मात्र यंदा १२.३३ टक्के असून तीन टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






