
अमरावती : इयत्ता बारावीच्या निकालात चिखलदरा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी १७.०७ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. मोर्शी तालुका ८८.८१ टक्केवारी मिळवत माघारला.
बारावीच्या परीक्षेत इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, संस्कृती, पाली या भाषांसह इतिहास, राज्यशास्त्र, गणित, भूगोल, विज्ञान, सामाजिकशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र यांसह एकूण १२३ विषयांपैकी पसंतीनुसार विद्यार्थ्यांना विषय निवडता येतात. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून बारावीच्या परीक्षेत ३४५८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण ३०९३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, चिखलदरा तालुक्यानंतर नांदगाव खंडेश्वरची निकालात सरशी ठरली. अमरावती तालुक्यात सर्वाधिक १०१९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी निकालाच्या टक्केवारीत माघारल्याचे दिसून येते. अमरावती तालुक्याचा निकाल १०.६६टक्के आहे. भातकुली तालुक्यात ७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९३२६ टक्के निकाल आहे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११४३ विद्यार्थी उत्तीर्ण असून ९५.८० टक्के आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ११४७ उत्तीर्ण झाले असून, ९४.४८ टक्के निकाल आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात १३२९ उत्तीर्ण झाले. ९४.०५ टक्के निकाल लागला आहे. तिवसा तालुक्यात ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ९३.७९ टक्के निकाल आहे. मोर्शी तालुक्यात १६२८ उत्तीर्ण झाले असून ८८.८१ टक्के निकाल आहे.
वरूड तालुक्यात २११४ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ९२.५१ टक्के निकाल आहे. चांदूर बाजार तालुक्यात २२५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ९२.११ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात २९१३ विद्यार्थी उत्तीर्ण असून ९२.९४ टक्के आहे. अंजनगाव सूर्जी तालुक्यात १५०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ११.०९ टक्के निकाल आहे. दर्यापूर तालुक्याचा निकाल ९३५१ टक्के आहे. चिखलदरा तालुक्यात १९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धारणी तालुक्यात १९१५ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ९३.२३ टक्के निकाल आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






