बुद्धं शरणं गच्छामि… विश्वशांती रॅलीने अंबानगरी दुमदुमली !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : दरवर्षाप्रमाणे यंदाही7शहरातून बुद्ध जयंतीनिमित्त विश्वशांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीत सहभागी महिला, पुरुषांनी पांढरे कपडे परिधान करत, हातामध्ये पेटती मेणबत्ती घेऊन बुद्धं शरणं गच्छामि असा उच्चार करत ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाली. समारोप भीम टेकडी येथे करण्यात आला. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पंचशील झेंडा Brings रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी आ. बळवंत वानखडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते, गुणवंत देवपारे उपस्थित होते. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६८ जयंती बुद्ध पौर्णिमा जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात+साजरी करण्यात आली. बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रॅली काढण्यात आली, तर यंदाही बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा १९ ते २३ मे असे पाच दिवसीय विविध कार्यक्रमांतून जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ही विश्वशांती रॅली काढण्यात आली. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बुद्ध पूजा भदंत बुद्धघोष महाथेरो यांनी केली. रॅलीत बिशप हाउस अमरावतीचे फादर महागुरु स्वामी फादर जोश, फैजी अबरारचे सचिव हाफिज नाजिम साहब, गुरुद्वारा सिंग सभेचे अध्यक्ष तजिंदर सिंग बोवेजा, रवींद्र सिंग सलुजा उपस्थित होते.

रॅलीत १५० श्रामनेर, महापुरुषांची वेशभूषा साकारलेले कलावंत, गौतम बुद्ध, दीक्षाभूमी व चैत्यभूमीचा देखावा, महिलांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी आयोजक सुनील रामटेके, रत्नाकर सिरसाट, अशोक मेश्राम, प्रफुल्ल गवई, जगदीश गोवर्धन, सुभाष महाजन, मनोज शेगोकार, भारत पाटील, मनीष भंकाळे, विजय तेलमोरे, मदत गायकवाड, विनोद कुंभलवार, अतिश गोसावी, भीम मेश्राम यांच्यासह इतर समाजबांधवांनी सहकार्य केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!