
अमरावती : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या परीक्षेत २५ हजार ५८२ पैकी २५ हजार ३१६ आजी, आजोबा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ९२७ आजी अन् ८ हजार ३८९ आजोबांचा समावेश आहे. तर २६६ जण या परीक्षेत नापास झाले आहे. नातवासोबत शिक्षणाचे धडे गिरविलेले आजी, आजोबा पास आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ २५ हजार ५८२ निरक्षर नोंदणीचे उद्दिष्ट होते. निरक्षरांना शिकविण्यासाठी २२४६ स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती. या सर्वेक्षणानंतर सर्व तालुक्यांत साक्षरतेच्या वर्गात शिकलेल्यांची १७ मार्च रोजी जिल्ह्यातील १६०३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत २५ हजार ३१६ आजी-आजोबा पास झाले.
काय आहे नवभारत साक्षरता अभियान?१५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ज्यांनी शाळेत जाण्याची संधी गमावली आहे, त्यांना जीवनाची गंभीर कौशल्ये शिकविण्यासाठी २०२२ ते २०२७ या पाच वर्षात साक्षर करण्यासाठी ‘नवभारत साक्षरता अभियान’ सुरू केले आहे,
२६६ आजी-आजोबांना प्रगतीची गरज नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत २६६ आजी-आजोबा नापास झाले आहेत.शिक्षण विभागाने त्यांच्यासमोर नापास झाल्याचा शेरा २ न मारता, त्यांना सुधारणा करण्याची गरज आहे.
सप्टेंबरमध्ये दुसरी चाचणी होणार वाचन, लेखन व संख्याज्ञा नावर प्रत्येकी ५० गुणांची ही परीक्षा होती. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४९.५ गुण आवश्यक होते. आता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापनाची दुसरी चाचणी सप्टेंबरमध्ये होणार आहे.
२५ हजार ५८२ आजी-आजोबांनी दिली परीक्षा नवभारत साक्षरता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या परीक्षेत २५ हजार ५८२ पैकी २५ हजार ३१६ आजी, आजोबा परीक्षा पास झालेत. यात १६ हजार ९२७ आजी अन् ८ हजार ३८९ आजोबांचा समावेश आहे, तर २६६ जण या परीक्षेत नापास झाले आहे.
२५ हजार ३१६ निरक्षर आजी-आजोबा पास झाले आहेत. या त २६६ जण नापास झाले आहे. नापास झालेल्यांना पुन्हा शिक्षण देऊन सप्टेंबरमध्ये दुसरी चाचणी घेतली जाणार आहे.
-प्रतिम गणगणे, सहायक शिक्षणाधिकारी (योजना)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






