तहसीलदारांनी अवैध रेतीचा टिप्पर पकडला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

शिरजगाव कसबा : चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह पथकाने शिरजगाव बंड येथे शिवाजी हायस्कूल नजीक वाळूने भरलेला टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात लावला. एमएच ३० एल ३९०१ क्रमांकाच्या टिप्परचा चालक- मालक रामेश्वर अंगारे (रा. कुरळ पूर्णा) याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्याच्याकडे रेती वाहतुकीबाबत परवाना नव्हता. काही दिवसांपूर्वी कुरळ पूर्णा येथील नदीपात्रातून ११ ब्रास रेती जप्त करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. चांदूरबाजार येथील मारवाडी परिसरातील दोन ब्रास रेती जप्त करून घरकुल लाभार्थीना वाटप करण्यात आली. कारवाईमध्ये तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह मंडळ अधिकारी प्रवीण काजी, संजय धांडे, अलका खडसे, नागले, तलाठी भारत पर्वतकर, प्रतीक चव्हाण, हरीश तळकित, अतुल पाटील, संजय चौधरी, प्रफुल डावरे, निवृत्ती घुलक्षे, आशिष काळे, राहुल जोशी यांनी सहभाग घेतला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!