मानलेल्या सासऱ्यानेच लुटले विवाहितेचे सर्वस्व !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

लअमरावती : मानलेल्या सासऱ्यानेच १९वर्षीय विवाहितेचे सर्वस्व लुटले. खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ ते ३ मे दरम्यान ही अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी २२ मे रोजी रात्री आरोपी चन्नू धाजू तांडीलकर (६०, रा. कोकरू, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी ही पती व मानलेल्या सासऱ्यासह जनावरे चारण्याकरिता खल्लार हद्दीतील एका शेतात आली होती. दरम्यान, १ मे रोजी रात्री १० च्या सुमारास फिर्यादी महिलेचे पती हे बाहेर गेले. त्यामुळे फिर्यादी महिला व आरोपी हे दोघेच शेतात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्ती करून तीन दिवस शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देखील तिला दिली. त्यामुळे ती काही दिवस गप्प राहिली. मात्र, काही दिवसांनी तिने ती बाब पतीला सांगितली. त्याने देखील तिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, २२ मे रोजी अखेर तिने खल्लार पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!