उद्दाम ऑटोचालक म्हणे, तुझे डोळे खूप नाजूक !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : तुझे डोळे खूप नाजूक आहेत, अशा शब्दांत छेड काढत एका ऑटोचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ३० एप्रिल व त्यानंतर पुन्हा एकदा येथील पंचवटी चौकात तो प्रकार घडला. या प्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी एमएच २७, बीडब्ल्यू ००७० क्रमांकाच्या ऑटोरिक्षाच्या चालकाविरुद्ध २२ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी ही एका गावाहून ऑटोरिक्षा वा बसने ये-जा करीत अमरावती येथे शिक्षण घेते. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान ती पंचवटी चौक येथे बसची वाट पाहत असताना आरोपी ऑटोरिक्षा चालक हा तेथे आला. ती त्याच्या ऑटोरिक्षात बसली. दरम्यानच्या काळात त्याने काही प्रवाशांना अन्य ठिकाणी सोडून दिले. त्यानंतर तुझ्या ड्रेसची ओढणी काढून ती तोंडाला बांध. तुझे डोळे खूप नाजूक आहेत, असे तो बरळला. त्यामुळे ती बिझीलँड भागात उतरली. त्यावेळी दुर्लक्ष करीत तिने त्याबाबत तक्रार दिली नाही.

पुन्हा तसाच प्रकार काही दिवसांनी पुन्हा पंचवटी चौकात ती विद्यार्थिनी बसची वाट पाहत असताना तोच आरोपी ऑटोचालक तेथे आला. जबरदस्ती ऑटोत बस, असे म्हणू लागला. त्यामुळे मला घ्यायला माझा भाऊ येत आहे, असे तिने त्याला सांगितले. त्यानंतरही आरोपी हा तेथे उभा राहिला. पैसे नसतील तरी चालेल, असे म्हणून तो तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागला. त्यामुळे भीतीपोटी तिने लागलीच गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्या उद्दाम ऑटोरिक्षाधारकाचा शोध चालविला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आरटीओशी पत्रव्यवहार करणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!