रस्त्याच्या बांधकामात पाइपलाइन लिकेज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अचलपूर : रासेगाव ते अचलपूर मुख्य मार्गावरील नसीबपुरा भागात नवीन काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाखालील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन लीक झाल्यामुळे पाणी आजूबाजूच्या घरांसमोर गोळा होत आहे. याशिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा धोका वाढला आहे.

नसीबपुरा भागातील काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामादरम्यानच येथे पिण्याच्या पाइपलाइनला लिकेज झाले. नगर परिषदेला निवेदन देऊन एक महिना लोटला तरी पाइपलाइन दुरुस्त केली नाही. या लिकेजमुळे नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचले आहे. नळातून दूषित व गढूळ पाणी येत आहे. अचलपूर नगर परिषदेने तत्काळ हा लिकेज दुरुस्त करावा, अशी मागणी उमेश बडोदे, विशाल चकोले, विष्णू अंभोरे, गजानन कलणे यांनी नगर परिषदेकडे निवेदनातून केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!