
तिवसा : वर्धा नदीपात्रात २७ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करून या व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली आहे.
बाबाराव महादेव पारिसे (५५, रा. नमस्कारी, ता. तिवसा) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी नमस्कारी गावालगतच असलेल्या भारसवाडा (जि. वर्धा) येथे आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये पारिसे यांचा मुलगा खरेदीसाठी गेला होता. बाजारातून घरी परतला तेव्हा त्याला वडील दिसले नाहीत. म्हणून त्याने आईकडे चौकशी केली. ते मोबाइल रिचार्ज करण्यासाठी गेल्याचे आईने सांगितले. पण, बराच वेळ उलटूनही बाबाराव पारिसे घरी न आल्याने पत्नी व मुलाने त्यांचा आसपासच्या परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाइकांसह नदी परिसरात पायवाटेने शोधत असताना मुलाला बाबाराव पारिसे यांचे धूड नदीपात्रात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या कपाळ, गाल आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. मुलाने तत्काळ तळेगाव (श्यामजीपंत) ठाणे गाठले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






