अर्जुननगर चौकात १५.४२ किलो गांजासह दोघे अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने २८ मे रोजी रात्री अर्जुननगर चौकातून अटक केली. त्यांच्याकडून १५.४२५ किलो गांजासह दोन मोबाइल व रोख असा एकूण ३ लाख २८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जाकीर खान वल्द रहेमत खान (४०, रा. ताजनगर क्रमांक २) व छत्रपती कचरूजी बांबोर्ड (६०, रा. लुंबिनीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी रात्री दोघेजण रहाटगावकडून अमरावतीकडे येणाऱ्या रस्त्याने गांजा घेऊन येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने अर्जुननगर चौकात सापळा रचून जाकीर खान व छत्रपती बांबोर्डे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगची पाहणी केल्यावर त्यात १५.४२५ किलो गांजा आढळून आला. त्यानुसार दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून गांजा, दोन मोबाइल व ८ हजार ५० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेडडी, उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारवकर व सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात व गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक महेशकुमार इंगोले, सत्यवान भुयारकर व योगेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक संजय वानखडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, सुधीर गुडधे, अजय मिश्रा, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराडे, योगेश पवार, नीलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, अनिकेत वानखडे, संदीप खंडारे यांनी केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!