निवडणुकीचे टेन्शन संपले उमेदवार समाजकार्यात गुंतले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी दि. २६ एप्रिल रोजी मतदान झाले. आता दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, दीड महिन्यांचा अवकाश असल्याने सर्वच उमेदवार रिलॅक्स झाले आहेत. स्पर्धेतील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर कमालीचा ताण होता. तो आता निवळला आहे. या कालावधीत उमेदवार काय करीत होते, हे त्यांच्याकडून जाणून घेतले.

अमरावती लोकसभा मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात होते. सुरुवातीच्या टप्प्यात तिहेरी लढत होती. मात्र शेवटच्या टप्प्यात दुहेरी लढत झाली. यामध्ये उच्चांकी ६३.६७ टक्के मतदान झाल्याने एकेका मतांसाठी संघर्ष झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

अशा परिस्थितीत स्पर्धेतील उमेदवारांवर कमालीचे टेन्शन होते. ते आता कमी झाले. त्यामुळे निवडणूक संपताच उमेदवारांनी पहिले मतदारसंघात संपर्क साधून मतदारांचे आभार मानले व कार्यकर्त्यांशी संवाद साधून झालेल्या मतदानाविषयीची माहिती जाणून घेतली.

महायुतीच्या उमेदवार या भाजपच्या स्टार प्रचारक असल्याने त्यांना पक्षाच्या आदेशानुसार किमान सात राज्यांमध्ये जाऊन पक्षाच्या उमेदवारांसाठी रोड शो, रॅली, सभा आदी घाव्या लागल्या. याशिवाय महाआघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांनी समाजकार्यात गुंतवून घेतले आहे.

नवनीत राणा (महायुती) :महायुतीमध्ये नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहे. राणा यांनी मतमोजणीची प्रक्रिया आटोपताच मतदारसंघात संपर्क करीत मतदारांचे आभार मानले व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याशिवाय राणा भाजपच्या स्टार प्रचारक असल्याने त्यांना महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जावे लागले. रोड शो, रॅली,प्रचारसभा यामध्ये राणा गुंतल्या आहे.

बळवंत वानखडे (मविआ) :दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार आहे. मतदान प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवसापासून बळवंतराव यांनी विश्रांती घेतली नाही. त्यांनी प्रथम कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व दौऱ्यादरम्यान मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कार्यकर्त्याच्या घरचे लग्नात सध्या बळवंतराव वानखडे यांची हमखास उपस्थिती दिसून येत आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!