मरायची हौस नाही; पण इथे नाही तर राहायला, व्यवसायाला जाणार कोठे?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : सुमारे दीड वर्षापूर्वी प्रभात चौकातील अतिशिकस्त इमारत पडून पाच जणांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर शहरातील अतिशिकस्त इमारतींचा मुद्दा चांगलाच चव्हाट्यावर आला होता. महापालिकेने पुन्हा एकदा सीवन, सीटू या वर्गवारीतील इमारतींची पुनःपाहणी करून अनेक अतिशिकस्त इमारती पाडल्या. मात्र, त्यानंतरही काही इमारती न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने त्यातील भाडेकरू, दुकानदार व रहिवासी अजूनही तेथेच जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे वास्तव आहे.

विशेष म्हणजे, प्रभात चौकातील इमारत पडून पाच बळी गेल्याने राजापेठ झोनच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे झोनच्या उपअभियंत्यांनी अतिशिकस्त इमारतींचा भार आमच्या डोक्यावरून काढून घ्यावा, अशी विनंती देखील केली होती. मात्र, ती जबाबदारी तूर्तास तरी त्यांच्याकडे आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा पावसाळ्याच्या तोंडावर अतिशिकस्त इमारती पाडून टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

कित्येक वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करतोय, राहतोय. सर्वोच्च न्यायालयानेदेखील आमच्या बाजूने, पुनर्वसनाच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र, संबंधित नवा मालक आम्हा भाडेकरूंच्या पुनर्वसनाबाबत चकार शब्दही काढत नाही. –

भाडेकरू, खापर्डे वाडा.

३२ धोकादायक इमारती शहरात महापालिकेच्या राजापेठ झोनमध्ये १७, तर भाजीबाजार झोनमध्ये १५ अशा एकूण ३२ इमारती अतिधोकादायक अर्थात सी-वन टाईप आहेत.

धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांनी जायचे कोठे?गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक अशा धोकादायक इमारतीत राहत आहेत, तर तखतमल मार्केटमध्ये २०० च्या जवळपास दुकाने आहेत. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही या इमारचीत आम्ही थाटलेला व्यवसाय करीत आहोत. इमारत जीर्ण झाली, हे आम्हालादेखील ठावूक आहे. मात्र, इमारत पाडली तर जगायचे कसे, असा प्रश्न आम्हाला सतावत आहे.

-एक दुकानदार, तखतमल

५०० नागरिक राहतात अतिशिकस्त इमारतीत शहरातील अतिशिकस्त व धोकादायक इमारतीत रहिवाशांच्या तुलनेत दुकाने अधिक आहेत. अशा इमारतींमध्ये सुमारे ५०० जण राहत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात दोन अपघात गेल्या पावसाळ्यात सराफ्यातील एक अतिशिकस्त इमारत रात्रीच्या वेळी पडली होती, तर गांधी चौक, अंबादेवी रोडवरील इमारत पडून त्याखाली काही दुचाकी दबल्या गेल्या होत्या.

अनेक वेळा दिल्या नोटिसा महापालिकेने अनेकदा अतिशिकस्त इमारतधारकांना त्या खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.

३२ इमारती अतिशिकस्त‘महापालिका हद्दीत एकूण ३२ इमारती या अतिशिकस्त अर्थात सीवन या वर्गवारीतील आहेत. त्यातील काही इमारती निर्मनुष्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातील राजापेठ झोनमधील काही इमारती निर्मनुष्य करण्यात आल्या आहेत.

– रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता, मनपा अमरावती

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!