विद्युत तार पडून सात जनावरे दगावली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : भातकुली तालुक्यातील हरताळा शिवारामध्ये विद्युत खांबावरील तुटलेल्या वाहिनीच्या स्पर्शान सात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

दिलीप दुर्गे, किशोर देशमुख, गजानन राऊत, प्रदीप संके, ज्ञानेश्वर चहाकर, जगन चेनगोडे, राजू उघडे यांच्या मालकीची ती जनावरे होते. यामध्ये एक बैल व सहा गाईचा समावेश आहे. अनेकदा तक्रारी करून देखील उपाययोजना होत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. महावितरणने तात्काळ नुकसान भरपाईची करावी, अन्यथा मृत जनावरे महावितरण कार्यालयात घेऊन जाऊ, असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. घटनेची माहिती भातकुली येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी वाहिनीचा वीजप्रवाह बंद केला. भातकुली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. तहसीलदार अजित कुमार येळे,महावितरण कार्यकारी अभियंता योगेश लहाने, तलाठी केराम, पशुवैद्यकीय अधिकारी यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली.

महिला मजूर थोडक्यात वाचल्या मजूर शिवारात काम करीत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत विद्युत खांब्यावरून जिवंत तार तुटली आणि विद्युत ताराला स्पर्श झाल्याने सात जनावरे मेली. जनावरांच्या हंबरड्याने पुढील धोका महिला मजुरांच्या लक्षात आला, अशी प्रतिक्रिया तेथे उपस्थित महिला मजुराने दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!