महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह क्वार्टरमध्ये आढळला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

लेहेगाव : नजीकच्या नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या क्वार्टरमध्ये आढळून आला. चंद्रपूर येथील त्यांच्या मित्राने तेथील खासगी डॉक्टरला कॉल लागत नसल्याचे कळविल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती.

पोलिस सूत्रांनुसार, डॉ. सुषमा तिरपुडे (४५) असे मृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या एकट्याच आपल्या क्वार्टरवर राहत होत्या. मागील दोन दिवसांपासून त्या फोन उचलत नव्हत्या. म्हणून चंद्रपूरच्या त्यांच्या पोहरकर नामक मित्राने नेरपिंगळाई गावातील खासगी डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक इंटरनेटवरून शोधला. त्यांना डॉ. तिरपुडे या दोन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे सांगितले. या फोननंतर त्यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली असता, तेथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर क्वार्टरमध्ये झोपल्या आहेत असे सांगितले. मात्र, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, आतून कुठलाही प्रतिसाद नव्हता. त्यानंतर या क्वार्टरची खिडकी उघडून पाहिले असता, त्या बेडवर पडून असल्याचे त्यांना दिसले.

सहकाऱ्यांनी तसदीही घेतली नाही नेर पिंगळाई आरोग्य केंद्राचा परिसर मोठा असून येथे २४ बाय ७ वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. अशावेळी कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी दोन दिवसांपासून ‘आऊट ऑफ रीच’ येत असल्याचे तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या गावीही नव्हते. दोन दिवसांपासून कुणीही हाकेच्या अंतरावरील क्चार्टरकडे कसे फिरकले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!