समता कॉलनीतील ‘हिट अँड रनर्स’चे चेहरे अखेर उलगडले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : दुचाकीस्वाराला धडक मारून पळून गेलेल्या कारमधील ‘हिट अँड रनर्स’चे चेहरे उलगडण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला घटनेच्या २७ दिवसांनंतर यश आले. याप्रकरणी, कारचालकासह अन्य एकाला अटक करण्यात आली, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. कारदेखील जप्त करण्यात आली आहे. पुण्याच्या ‘पोर्शे’ प्रकरणाच्या धर्तीवर अमरावतीतील समता कॉलनी भागात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी शोधण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासामुळे तो उलगडा झाल्याचे ते म्हणाले. या प्रकाराला सर्वप्रथम ‘z24news.dreamhosters.com’ने वाचा फोडली होती. हे विशेष.

याप्रकरणी धारणी तालुक्यातील सुसर्दा येथील आश्रमशाळेचा शिक्षक तथा कारमालक प्रशांत जनक बघाडे (वय ३९) व निखिल दिनेश बघाडे (२४, दोघेही रा. नांदरुण, ता. दर्यापूर) यांना अटक करण्यात आली. प्रशांत, निखिल व एक मुलगा असे तिघे ३ मे रोजी

सकाळी अमरावती येथे एका लग्न समारंभात आले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मूळ गुन्ह्यात आता सदोष मनुष्यवध व पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न ही कलमे वाढविण्यात येणार असल्याची माहिती सीपी रेड्डी यांनी दिली. भिल्याने तेथून पळ काढल्याची कबुली आरोपींनी दिली.

२० हजारांचे बक्षीस केले होते जाहीर

वाहने यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली ती कार कुठल्या कंपनीची, मॉडेल कोणते, ते फुटेजमधून उलगडल्याने पोलिसांच्या चार पथकानें त्या विशिष्ट मॉडेलच्या तब्बल १३७ कारची, मालकांची माहिती घेतली. त्याअनुषंगाने शहर तथा जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील गॅरेजदेखील तपासले. २० हजारांचे बक्षीसदेखील जाहीर केले. त्या तांत्रिक तपासादरम्यान नांदरुण येथील एक व्यक्ती ३ मे रोजी आपल्या कारने अमरावतीला आली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवार नांदरुण गाठून आरोपींना अटक केली.

यांनी केला उलगडा पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या निरंतर प्रयत्नांती आरोपींच्या चेहऱ्यांची उकल झाली. उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील व गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात व गुन्हे शाखा प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात एपीआय मनीष वाकोडे, प्रकाश झोपाटे, अंमलदार राजू बाहेनकर, फिरोजखान आदींनी ही कामगिरी केली.

३ मे रोजी घडला होता प्राणांतिक अपघात३ मे रोजीच्या घटनेतील भीमसेन वाहने (६५, रा. किशोरनगर) यांचा १२ मे रोजी मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत कारचालकाचा शोध घेण्याची मागणी मुलाने पोलिस आयुक्तांकडे केली होती. तो अपघात सीसीटीव्हीत कैद झाल्याने व फुटेज मिळाल्याने आयुक्तांनी स्वतः ते गंभीर प्रकरण हाताळले. पांढऱ्या कारने दुचाकीस्वारास धडक दिल्याचे व कारमधून तीन इसम खाली उतरून ते जखमीस पाहून पळून गेल्याचे फुटेजमध्ये दिसले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!