
अमरावती : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी बियाणी चौक ते तपोवन गेट मार्गावर असलेल्या लोकशाही भवनात होणार आहे. वाहतुकीची कोंडी अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी मागाने वळविण्यात येणार आहे. अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांनी कळवली आहे.
हे असतील पर्यायी मार्ग मार्डीमार्गे येणार तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतील वाहन चालकांना अमरावती शहरात येण्याकरिता पर्यायी मार्ग विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, अंधविद्यालय, चपराशीपुरा या मार्गाचा अवलंब करावा.
बियाणी चौक येथून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतीत जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्ग बियाणी चौक, चपराशीपुरा, अंधविद्यालय, वडाळी ओवरब्रिज चौक, दंत विद्यालय,विक्रांतलॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक.फक्त शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, परिसरातील रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवासस्थानी जाण्या-येण्यासाठी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. तसेच उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, एच. पी. गॅस गोडाऊन, कोषागार कार्यालय, प्रबोधिनी, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पशुसंवर्धन कार्यालय, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महाबीज कर्मचारी यांनी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी वाहनाने कार्यालय व निवासस्थानी जाण्या- येण्यासाठी विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.
लॉन, रचना सृष्टी, विद्यापीठ चौक.फक्त शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी, परिसरातील रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपले वाहनाने कार्यालय व निवासस्थानी जाण्या-येण्यासाठी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. तसेच उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, एच. पी. गॅस गोडाऊन, कोषागार कार्यालय, प्रबोधिनी, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पशुसंवर्धन कार्यालय, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महाबीज कर्मचारी यांनी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी वाहनाने कार्यालय व निवासस्थानी जाण्या- येण्यासाठी विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.
हे मार्ग बंद असतील बियाणी चौक ते तपोवन गेट हा मार्ग सर्व प्रकारांच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ४ जूनच्या सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






