१०० विहिरी, बोअरवर ८३ गावांची तहान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने सद्यस्थितीत नऊ गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिवाय तात्पुरता उपाय म्हणून प्रशासनाने खासगी ६३ विहिरी व ३७ बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. याद्वारे ८३ गावांची तहान भागविल्या जात आहे.

विशेष म्हणजे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात यावर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साधारणपणे १४ कोटींची कामे रखडली होती. २६ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर आठवड्याभरानंतर ही कामे मार्गी लागली आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिलेले ३० लाखांपर्यंच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. मात्र सध्याच्या भीषण पाणीटंचाईच्या काळात त्या उपाययोजना पूर्ण होऊ शकणार नसल्याचे वास्तव आहे.

जिल्हास्तरावर प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली काही कामे प्रक्रियेत तर काही सुरु आहेत. शिवाय १४ टैंकर व अधिग्रहणातील १०० विहिरी, बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

– सौरभ कटियार, जिल्हाधिकारी

तालुकानिहाय अधिग्रहणातील विहिरी, बोअर अमरावती तालुक्यात १० गावात १२, तिवसा ७ गावात ६, भातकुलीत १, चांदूर रेल्वे ३ गावात ३. धामणगावात २ गावात २, नांदगावात १७ गावांमध्ये १८, अचलपूरमध्ये ३ गावात १०, मोर्शी १४ गावात १६, वरुड तालुक्यात २, धारणी ८ गावात १० व चिखलदरा तालुक्यात १६ गावांमध्ये २० विहिरी व बोअर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

१४ पैकी १३ टँकर नंदनवनात जिल्ह्यात सद्यःस्थितीत ९ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यापैकी ८ गावे व १३ टैंकर चिखलदरा तालुक्यात सुरू आहेत. यामध्ये बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहाद्दरपूर, गौरखेडा बाजार, लवादा येथे प्रत्येकी एक टैंकर तर आलाडोह येथे २ व खडीमल गावात चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!