
नांदगाव खंडेश्वर: शॉर्टसर्किटमुळे शहरातील भोईपुरा येथील सपना सपकाळ या मजूर महिलेच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागली. यामध्ये बचत गटाकडील कर्जाच्या २२ हजारांच्या रकमेसह घरातील धान्य व साहित्याची राखरांगोळी झाली.
सपकाळ कुटुंब शेतात कामाला गेले होते. आग पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी ती आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, या आगीत रोख रकमेसह घरातील साहित्य भस्मसात झाले. शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाला त्वरित मदतद्यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर, राष्ट्रवादीचे मोहम्मद साजिद, श्याम शिंदे, देवेंद्र कंटाळे, अमोल सोनोने, शुभम रावेकर, प्रफुल्ल सोनोने आदी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 44






