यवतमाळ- वाशीम लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांच्या दणदणीत विजय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर नुकत्याच झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय झाला झालेला आहे ,दिनांक 26 एप्रिला लोकसभेची निवडणूक पार पडली होती, अनेक लोक तर्कवितर्क आपापल्या पद्धतीने लावत होते राजश्री पाटील दणदणीत विजय होणार, तर कोणी संजय देशमुख यांचा विजय होणार असे बोलले जात होते ,परंतु जनता ही महत्त्वाचा दुवा असते या निवडणुकीत जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाला दाखवून दिले आहे, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद ,पंचायत समिती असो ,विधानसभा असो किंवा लोकसभा असो ही निवडणूक हवेवर जिंकता येत नाही त्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, आणि मतदान करताना जनता जनार्दन महत्त्वाचा दुवा मानला जात असते ,परंतु काही लोक काही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला काडीकचरा समजतात व फक्त निवडणुकीपुरता वापर करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम करत असतात काही लोकप्रतिनिधी आमची हवा आहे आम्हीच निवडून येणार आमच्या पेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे दाखवण्याचे काम करतात परंतु मतदान मारणारा हा जनता जनार्दन हे काय करू शकते हे मात्र यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे यवतमाळ जिल्ह्यात भाजप, शिवसेना शिंदे गट ,व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे आमदार असताना सुद्धा यावेळी बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी यांच्यातर्फे असलेले संजय देशमुख यांना प्रचंड मतदानाने जवळपास 94 हजार 473 एवढ्या मताधिक्याने निवडून दिले महाविकास आघाडीच्या धर्म पाळुन सर्व नेते लोकांनी प्रचारामध्ये आघाडी घेऊन संजय देशमुख यांचा दणदणीत विजय खेचून आणला आणि गद्दाराला त्यांची जागा दाखवून दिली त्यामुळे सामान्य जनता ही गद्दारा विरोधी आहे व गोरगरीब जनतेसाठी जो नेता झटू शकतो अशाच लोकांना निवडून दिल्या जाते हे एकदा दाखवून दिले आहे नवनियुक्त खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की मी गोरगरीब जनतेसाठी यवतमाळ वाशिम मतदार संघातील सामान्य जनतेसाठी सर्व मतदार संघात निष्ठेने काम करीन विकास करीन व असे मतदाराला भासू देणार नाही की मी कोणत्या माणसाला मतदान केले त्यांच्या मनात कोणत्याही शंका उपस्थित होऊ देणार नाही मी गोरगरीब जनतेसाठी धावून जाणे व जनतेचे काम एकनिष्ठ ने करीन व यवतमाळ वाशीम लोकसभेचा विकास आवश्यक भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!